Monday, 15 June 2020
Sunday, 14 June 2020
QUIZ CORNER
प्रश्नावली
Friday, 12 June 2020
NEWS CORNER
दि. १५/०७/२०२०
कोरोना.. आणि महापुरुषांचे राष्ट्र कार्य
कोरोना सारखे महामारीचे आजार या पूर्वीही जगामध्ये येऊन गेले ज्यावेळी तंत्रज्ञानाचा अभाव होता, मेडिकल सायन्स आजच्या सारखे अत्याधुनिक झालेले नव्हते. जनमाणसावर अंधश्रद्धाचा फार मोठा पगडा होता, हॉस्पिटल, डॉक्टर्स यांची संख्या खूपच अल्पप्रमाणात होती अश्या अभाव ग्रस्त वातावरणात कोरोना सारख्या जीव घेण्यासाथी मोठ्याप्रमाणावर येऊन गेल्या ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. याअगोदर प्लेग सारख्या साथीने जगभरात थैमान घातले असता, लोक मृत्युच्या भयाने सैरभैर झाले होते. अश्या भययुक्त वातावरणात महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले यांनी अश्या साथीच्या आजारात अविस्मरणीय असे कार्य केले व जे आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावे असे आहेत.
कोरोना आणि महात्मा गांधी
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत असताना, ई. स. १८८७ मध्ये प्लेग सारख्या साथीने जोहान्सबर्ग शहरात थैमान घातले होते. अविकसित दक्षिण आफ्रिकेतील राज्यकर्ते प्लेगच्या साथीला अटकाव करण्यास असमर्थ असताना महात्मा गांधीनी लोकांना धीर देण्यास सुरवात केली. आपल्या मित्र-मंडळीच्या माध्यामातूननिधी जमा करून जोहान्सबर्ग शहरात रुग्णावर उपचार करणारी यंत्रणा उभी केली. वाड्यावस्त्यावर जाऊन लोकांना धीर देऊन योग्य उपचार करण्याचे मार्गदर्शन केले, या रूग्णामध्ये बहुसंख्य रुग्ण भारतीय मजदूर होते. अश्या गरीब मजदूरांचे हाल पाहून गांधी कळवले आणि दिवस रात्र या साथीच्या आजाराने भयग्रस्त झालेल्या लोकांना साथीच्या विरूधात लढण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता, एकांगी शिलेदाराप्रमाणे या साथीच्या आजारात महात्मा गांधीनी अविस्मरणीय असे कार्य केले. कोरोना सारख्या आजाराने आज भारतीय जनता भयग्रस्त झालेली असताना आमचे आजचे राज्यकर्ते जनतेला कसा धीर देत आहेत, हे सर्वज्ञात आहे. अश्यावेळी म्हणूनच महात्मा गांधीजीच्या या धीरोदत्त कार्याची आठवण येते.
**
कोरोना आणि राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराजानी ई.स. १८९७ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये आपल्या जनतेसाठी केले कार्य आजही राज्यकर्त्यांना मार्गदर्शक व्हावे असे आहे. ई.स. १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने कोल्हापूर संस्थान सह पुणे, मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. ही साथ रोखण्यासाठी अपुरे साधने व तंत्रज्ञानाचा अभाव होता. अश्या अनिश्चितेच्या कालखंडात या साथीपासून आपल्या जनतेला लागण होवू नये म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या साथीला अटकाव करण्यासाठी सर्वप्रथम सबनीस नावाच्या अधिकाऱ्याला प्लेग कमिशनर म्हणून नियुक्त केले, आणि प्लेग कमिशनरच्या नियंत्रणाखाली अंमलबजावणी यंत्रणा उभारली. तसेच जनजागृतीसाठी साथीच्या आजाराची माहिती देणारे लाखो पत्रकांचे वाटप केले, निरक्षर लोकांसाठी पत्रकाचे सार्वजनिक वाचन करण्याची सोय केली. वाड्यावस्त्या, गाव, तांडे ठिकाणा भेट देऊन शाहू महाराज लोकांना धीर देण्याचे जातीने लक्ष देऊन कार्य करत ज्यामुळे भयग्रस्त जनतेला आपल्या जीवाची रक्षा करणाऱ्या आपला वाली आहे. हे आत्मिक बळ मिळत असे. शाहू महाराज एवढ्यावर थांबले नाही तर देशातील पहिले होमेओपथिक रुग्णालय सुरु करून आपल्या संस्थानातील जनतेला जगामध्ये तत्कालीन काळी उपलब्ध असणारी अत्याधुनिक औषधी उपलब्ध करून दिली. शाहु महाराजांनी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जे वेगवेगळे उपाय योजले त्यामध्ये संस्थानामध्ये येणाऱ्या-जाणऱ्या लोकांची चेक पोस्ट उभारून तपासणी सुरु केली, तसेच संस्थानातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा उभारून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली गेली, तसेच जत्रा, यात्रा, महोत्सव, संमेलने अश्या गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालणारे जाहीरनामे प्रसिद्ध केले. शाहू महाराजानी जनतेच्या काळजीपोटी अनेक जाहीरनामे काढले, असाच ज्योतिबा यात्रा संदर्भात काढलेला बंदीचा हुकुम महाराज जनतेची किती काळजी घेतो ते याचे या जाहीरनाम्यावरून लक्षात येईल. ज्योतिबाची यात्रा कोल्हापूर संस्थानातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध होती, ज्योतिबाच्या डोंगरावर भरणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून ही भाविक येत असत. या यात्रेमुळे प्लेगची साथ पसरेल व मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होईल म्हणून महाराजांनी ही यात्रा रद्द करण्याचा हुकुम काढला. या हुकुमामध्ये महाराज म्हणतात,
“सर्व लोकांस कळण्याकरिता ह्या जाहीरनाम्याने प्रसिद्ध करण्यात येते की, प्रस्तुत मुंबई, पुणे वगैरे बऱ्याच ठिकाणी ग्रंथिक संनिपात तापाचा अजार (ब्युबॉनिक प्लेग) सुरु असून काही ठिकाणी पटकीचे अजाराचीही सुरुवात झाली आहे व शिवाय दुष्काळचे कारणाने वैरणीची तुट सर्वत्र असून ती फार महाग मिळते व कोठें कोठें मुळीच मिळत नाही, या सर्व कारणांकरिता येत्या चैत्र शुद्ध १५ रोजी कोल्हापूरनजीक वाडी रत्नागिरी उर्फ जोतीबाचे डोंगरावर होणारी श्री केदारलिंगची यात्रा बंद करण्यांत आली असून तेथें कोणाही यात्रेकरूस जाऊ दिले जाणार नाही”.
अश्या साथीसमयी महाराजांनी हुकुमनामे काढून लोक भावनेपेक्षा संस्थानीतील जनतेचे जीव महत्वाचे या हेतूने कर्तव्य कठोर होऊन धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम बंद केले. वरील हुकूमनामा पाहिल्यास असे लक्षात येईल, शाहू महाराज जनतेच्या काळजीपोटी किती कठोर पणे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून आपल्या संस्थानातील जनतेला साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घेत होते. शाहू महराजांच्या या साथीतील या कार्याचा अभ्यास करून आजच्या काळातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी राबविलेले धोरण उपयोगी ठरू शकते.
**
कोरोना आणि सावित्रीबाई फुले
प्लेगचा कोलकत्ता परिसरात ई. स. १८९८ साली उद्रेक झाला होता. या साथीवर औषध नसल्यामुळे सगळीकडे भीती युक्त वातावरण तयार झाले होते. प्लेगच्या साथीने रुग्णासोबत इतर सामान्य जनताही नैराश्यग्रस्त झाली होती. सगळीकडे साथीने कहर केला होता. घराघरामध्ये मृत्यूचे तांडव सुरु होते, अश्या बेसूर वातावरणात सामान्य जनतेला आधार देणार कोणी नव्हत अश्यावेळी ‘ना देखवे डोळा म्हणून येतो कळवळा’ या तुकाराम महाराजाच्या वचनाप्रमाणे अश्या भयग्रस्त जनतेला धीर देण्यासाठी जीवाची पर्वा न करता स्वामी विवेकानंद बाहेर पडले आणि जनतेला मानसिक बळ देण्यासाठी खंबीर पणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले. आपल्या देशात कोरोना साथीला चार महिने होत आहेत, या चार महिन्यात देशामध्ये असणाऱ्या लाखोच्या संख्येने संत, महत, जगतगुरू मात्र जनतेला धीर देण्याऐवजी मौन धारण करून बसले आहेत, आणि त्या काळी भगव्या कपड्यातील साधू, स्वामी साथ रोगाने बळी पडलेल्या लोकांच्या घरोघरी जाऊन दुखीतांचे अश्रू पुसण्याचे काम करतो, स्वामी विवेकानंदच हृद्य घेऊन झगमगाटात वावणाऱ्या साधू महाराजांनी कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेचे अश्रू पुसले असते, जनतेला खूप मोठा आधार मिळाला असता. वेळ गेलेली नाही आता तरी स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेऊन आजच्या साधू महंतांनी भक्तांकडून जमा झालेली करोडोची सपंत्ती गरजू भुकेल्यांसाठी उपयोगी आणावी.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन काळी प्लेग मुळे अनेक शहरात हाहाकार उडालेला असताना पुणे शहर त्यापासून दूरू राहू शकले नाही. ई. स. १८९७ मध्ये पुणे शहरात प्लेगने जेव्हा हातपाय पसरलेले, तेव्हा तत्कालीन अनेक सुधारक या साथीमध्ये जनतेला धीर देण्याचं काम करत होते. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या जीवाची परवा न करता आपल्या डॉक्टर पुत्राच्या मदतीने डोंगरावर छोटे खाने प्लेग साठी हॉस्पिटल सुरु करते आणि प्लेग रुग्णांना वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने धावपळ करतात. प्लेग झालेल्या रुग्णांना पाठीवर टाकून हॉस्पिटल मध्ये नेतात. आपला पुत्र डॉ. यशवंतच्या मदतीने रुग्णांना वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. प्लेग च्या साथीतून हजारो रुग्णांना वाचवणाऱ्या सावित्रीबाई प्लेग मुळेच शेवटी बळी जातात. त्याचे हे बलिदान आजही राष्ट्राला प्रेरणादायी आहे. रुग्ण सेवेचा वसा घेतलेल्या आज हजारो नर्स भगिनी, डॉक्टर महिला मोठी किमंत चुकून रुग्ण सेवा करत आहेत. या सर्व सावित्रीच्या लेकी सावित्राबाई फुले यांनी दिलेल्या आरोग्य सेवेचा महान वारसा आज पुढे चालवत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.
**
कोरोना आणि स्वामी विवेकानंद
कोरोनासारख्या महामारीच्या साथीमुळे आज जग स्तब्ध झाले असून, कोरोना साथीची भीती दाखवल्या गेली आहे. अश्या पद्धतीने भीती दाखवण्यात आली आहे. जणूकाही या अगोदर कधी साथीचे आजर आले नव्हते, कोरोना पेक्षा भयंकर साथी या अगोदर जगात येऊन गेल्या आज पर्यंत १८ साथींनी जगभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवलेला होता. पंरतु कोरोना साथीवेळी माध्यमाचा विस्फोट झाल्यामुळे कोरोना संकट आहे त्यापेक्षा हजारो पट गंभीर बनविल्या गेले. त्यातच त्या त्या देशाचे प्रमुख गोंधळलेल्या अवस्थेत दिसून लागले आणि यातून गोंधळलेले निर्णय घेतले जाऊ लागले. अश्यावेळी जुन्या काळात आमच्या महापुरुषांनी अश्या आजारापासून वाचविण्यासाठी लोकांना भयमुक्त करण्यासाठी जे कार्य केले ते आजही प्रेरणादायी आहे. आमच्या राजकारण्यानी या महापुरुषांचा अभ्यास करून जनतेला धीर देणारे धोरण ठरवावे. हिच अपेक्षा!
संपादकीय टीम
शिक्षणविश्व


















